महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही'; अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं - उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar Slams Opposition : आजारी असल्यावरुन विरोधकांनी अजित पवारांवर राजकीय आजार असल्याची टीका केला होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर दिलंय.

Ajit Pawar Slams Opposition
Ajit Pawar Slams Opposition

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 2:20 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे Ajit Pawar Slams Opposition : उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूतून बरे झाल्यानंतर आज प्रथमच पुण्यात विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आजारपणावरुन विरोधकांना त्यांच्या शैलीत फटकारलंय.

काय म्हणाले अजित पवार : पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "दुर्दैवानं मी आजारी पडलो. मला डेंग्यू झाला होता. परंतु, विरोधकांनी राजकीय डेंग्यू झाल्याची टीका केली. पण मी लेचापेचा माणूस नाही. तक्रार करणं माझ्या स्वभावात बसत नाही" असं उत्तर अजित पवार यांनी आज पुण्यात विरोधकांना दिलंय. मध्यंतरी राजकीय गणितं बदलली त्यामुळं काही विकासकामं राहून गेली. परंतु, मी आता पुन्हा राजकारणात सक्रिय झालोय. त्यामुळं महाराष्ट्रातील शासकीय कार्यालय हे भाड्याच्या खोलीत राहू नये तसंच ते चांगलं सुसज्ज व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यासाठीच मी आज पुण्यातील शिक्षक भवन आणि सारथीच्या बिल्डिंगची पाहणी केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.


तेढ निर्माण होणारे वक्तव्य नेत्यांनी करु नये :अंतरवली सराटीतील अटकेबाबत मला माहिती नसून त्याबाबत माहिती घेतो. आरक्षणाबाबतीत काम सुरू आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणारं वक्तव्य कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी नेत्यानं करु नये. मी कुणाचं नाव घेत नाही पण कोणीही तसं बोलू नये आणि जाणून-बाजून जर कोणी सरकारला नुकसान करण्याच्या दृष्टीनं संपत्तीचं वाटोळं करत असेल तर सरकार ते सहन करणार नाही असंही उपपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यात दुष्काळी परिस्थिती :राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांची यशोदामध्ये बैठक घेणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात आलेली आहे. राज्यातलं हवामान सध्या बदललेलं आहे. हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे सरकारमध्ये सुद्धा बदल होतील. गतिमान सरकार होईल असं म्हणत त्यांनी यावेळी राजकीय टोलेबाजी सुद्धा केलीय.


हेही वाचा :

  1. Ajit Pawar Dengue : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण-प्रफुल्ल पटेल यांची माहिती
  2. Gram Panchayat Election 2023 : अजित पवारांची काटेवाडीत प्रतिष्ठा पणाला, भाजपानं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला पराभूत करण्याचं आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details