पुणे- महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढणार की काय होणार याविषयी अनेकांच्या मनात भीती आहे. यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा अधिकारी राज्यांना दिला जाईल, असे वाटत असल्याचे म्हटले आहे ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊन वाढवायचा का नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला जाईल, असे वाटत असल्याचे अजित पवार म्हणले. 20 लाख कोटी रुपये कोणाला भेटणार याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. पॅकेजमध्ये फक्त मोठे मोठे आकडे आहेत, असे काहीजण म्हणत असल्याची टीकाही पवार यांनी केली.