महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar : ...म्हणून मी स्टेजवर शरद पवारांच्या पाठीमागून गेलो; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Sharad Pawar

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्यावेळी सर्व नेते शरद पवारांच्या समोरून पुढे बसायला गेले, तर अजित पवार मात्र त्यांच्या पाठीमागून जाऊन खुर्चीवर बसले. त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर येण्यास टाळले असल्याची चर्चा सुरू होती. तशा पद्धतीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सगळ्या प्रकारावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Aug 1, 2023, 8:24 PM IST

अजित पवार

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आज शरद पवार आणि अजित पवार प्रथमच एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसले. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याचे. या सोहळ्याला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अजित पवार यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

अजित पवार शरद पवारांच्या समोर आले नाही : शरद पवार कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच स्टेजवर येऊन बसले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य स्टेजवर आले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आले. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस हे शरद पवारांच्या समोरून पुढे बसायला गेले, तर अजित पवार मात्र त्यांच्या पाठीमागून जाऊन खुर्चीवर बसले. कार्यक्रमातील या प्रसंगाची चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे.

अजित पवारांचे स्पष्टीकरण : या सगळ्या प्रकारावर अजित पवार यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आदर करतो, तसाच मीही त्यांचा आदर केला, असे अजित पवार म्हणाले. पुण्यातील महसूल सप्ताह अभियानाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पुण्यातील विधान भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

पुरस्कार सोहळ्याला अनेक नेत्यांची उपस्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी टिळक प्रतिष्ठाणचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार' स्वीकारण्यासाठी पुण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासह ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार प्रथमच सार्वजनिक रित्या एकत्र एका मंचावर दिसले.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar : देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक पुण्यात शिवाजी महाराजांनी केला - शरद पवार
  2. Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ, तर मोदींनी अजित पवारांची, मोदी-पवार बॉडीलँगवेजचा अर्थ काय?
  3. Eknath Shinde Nap : मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांची ब्रह्मानंदी टाळी?, Video Viral

ABOUT THE AUTHOR

...view details