महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही जावे कोणाकडे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पेच

भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचे बंड याबाबतचे चित्र स्पष्ट नाही.  त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर ‘आम्ही कोणाकडे जावे’ असा पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय

By

Published : Nov 23, 2019, 6:08 PM IST

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयामागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे, की अजित पवार यांचे बंड याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर ‘आम्ही कोणाकडे जावे’ असा पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट


शेतकरी संकटात आहे, त्यामुळे राज्यात लवकरात लवकर सरकार आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले. मात्र, अजित पवारांच्या या पाठिंब्याला सहमती नसल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱयांनी पेढे वाटून व आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'अजित पवार पुन्हा येणार, चंद्रकांत पाटलांसह 35 आमदार आमच्या संपर्कात'

इंदिरा काँग्रेसकडून अजित पवारांचा निषेध
अजित पवारांनी बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलून गेली. सत्तेत जाण्याच्या आनंदात असणाऱ्या राजकीय पक्षांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसने या घडमोडींचा निषेध केला आहे. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम केले. बारामती शहरातील गुणवडी चौकातील काँग्रेस भवनासमोर काळाझेंडा फडकवून अजित पवारांच्या भुमिकेचा निषेध केला. पोलिसांनी पुढील राजकीय संघर्ष टाळण्यासाठी हा काळा झेंडा काही वेळातच काढून घेतला.

इंदिरा काँग्रेसकडून अजित पवारांचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट
राजकीय घडामोडीचे केंद्र म्हणून बारामतीची ओळख आहे. पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्याचे समजताच येथील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या लाडक्या अजित दादांना उपमुख्यमंत्री पद मिळूनही बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details