पुणे - राज्याच्या राजकारणातलं दादा नेतृत्व अशी अजित पवारांची ओळख आहे. अजित पवार हे त्यांच्या खास रांगड्या शैलीसाठी ओळखले जातात. पण पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे पवारांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. अजित पवार राजकारणाच्या आखाड्यातून क्रिकेटच्या मैदानात फलंदाजीचा आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पवारांनी चौफेर फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्या दरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.
अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी... हेही वाचा -पक्षाला सोडून गेलेल्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम
नगरसेवक राजू मिसाळ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसरात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या सामन्यांदरम्यान शनिवारी दुपारी अजित पवारांनी या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी मिसाळ यांनी पवारांना फलंदाजी करण्याचा आग्रह केला. अजित पवारांनीही हातात बॅट घेत फलंदाजी केली.
हेही वाचा -'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'
शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांना गोलंदाजी केली. अजित दादांनी बनसोडे यांच्या गोलंदाजीवर चांगलेच फटके लागवले. एरव्ही अजित पवार हे आपल्या रांगड्या भाषणांमधून विरोधकााच्या दांड्या गुल करतात. क्रिकेट आणि राजकीय आखाडा यांच्यात फारसा काही फरक नाही. दोन्हीमध्ये डावपेच हेच जमेची बाजू असते, अशी चर्चा मैदानात रंगली होती.