अजित पवारांची प्रतिक्रिया पुणे Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. आज सकाळी दहा वाजता चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर येथे त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेत भेटीगाठींना सुरुवात केलीय. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केलंय. ((Ajit Pawar on Pimpri Chinchwad visit)
'हे' सगळं दिवा स्वप्न :राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पुणे मुंबई महामार्गावर टोलनाक्याजवळ भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, जोपर्यंत 145 चा मॅजिक फिगर दाखवू शकत नाही. तोपर्यंत हे सगळं दिवा स्वप्न आहे. कोणी आता शिल्लक राहणार नाही, सगळेच आपापले बोर्ड लावतील. बॅनर लावून काही होत नाही. कार्यकर्त्यांना फक्त समाधान वाटतं, असं मी मागे जेव्हा माझे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते, तेव्हा सांगितलं होतं. कुणी कुणाचे बॅनर लावायचे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळं मी याच्यावर कॉमेंट्स करण्याचं काही कारण नाही.
वाचाळवीरांची संख्या वाढली :यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या फोटोवर मला काही बोलायचं नाही. विकास आणि शहरातील समस्यांबद्दल विचारा. भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात बोलताना मी असल्या गोष्टींवर लक्ष देत नाही, असं म्हणत पडळकर यांना अजित पवार यांनी फार महत्व दिलं नाही. महाराष्ट्रातील वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपराही नाही, असं ते म्हणाले.
अनेक शहरांच्या दौऱ्यावर :देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांची अनुपस्थिती होती. यावर अजित पवार म्हणाले की, मी गेल्या काही दिवसांपासून अनेक शहरांच्या दौऱ्यावर आहे. ती वेळ शहरांना ठरवलेली आहे. त्या दिवशी माझा बारामती दौरा होता. बारामती, पिंपरी- चिंचवड शहराला वेळ दिल्यामुळं मी अमित शाह यांच्या दौऱ्याला जाऊ शकलो नाही. तसं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं, अशी स्पष्ट माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.
हेही वाचा :
- Ajit Pawar On NCP Dispute : विरोधक आमच्या नावावर बिल फाडून बदनामी करतात, अजित पवारांचा हल्लाबोल; राष्ट्रवादी कोणाची यावर म्हणाले...
- Ajit Pawar Group X Account Suspended: अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड...
- NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी