पुणे Ajit Pawar On NCP Dispute : राष्ट्रवादी कोणाची, याचा फैसला सहा तारखेला निवडणूक आयोग करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडं सगळ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील नोकर भरती कंत्राटी पद्धतीनं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून विरोधक जोरदार टीका करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. कंत्राटी भरतीचा निर्णय हा मागच्या सरकारचा आहे. आज विरोधक सत्तेत नाहीत, म्हणून आम्हाला बदनाम करुन आमच्यावर बिल फाडत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही अजित पवार यांनी आज पुण्यात दिली आहे.
राष्ट्रवादी कोणाची यावर होणार फैसला :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. निवडणूक आयोग सहा तारखेला राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला करणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्याबाबत निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सगळ्यांना आपलं म्हणणंं मांडण्याचा अधिकार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
विरोधक आमच्या नावानं पावत्या फाडतात :काही काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. त्यामुळे तत्कालिन सरकारनं कंत्राटी भरती घेण्याचा निर्णय घेतला होता. मागच्या सरकारमध्ये काय घडलं, ते सगळ्यांसमोर आहे. आज ते सरकारमध्ये नाहीत, त्यामुळे आमच्या विरोधात पावत्या फडतात, असा हल्लाबोल अजित पवार यांनी पुण्यात केला. डॉक्टर भरती असेल, इतर भरती असेल, रेग्युलर जागा भरेपर्यंत हा तात्पुरता निर्णय घेतल्यानं गैरसमज झाला आहे. त्यामुळे कारण नसताना मला ट्रोल करत आहेत. दीड लाख कर्मचाऱ्यांची राज्यात भरती होणार आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि म्हणून ते वेगळ्या बातम्या पसरवतात, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
कामाच्या व्यापामुळे अमित शाहांचा दौरा रद्द :मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन होणार आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा होणार आहे. मराठवाड्यातील मागास जिल्ह्यांच्या विकासकामांच्या बाबतीत, पावसाची स्थिती, पिकं अशा संदर्भात चर्चा होईल. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते, आगामी काळात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. वेगवेगळ्या देशाचे मान्यवर दिल्लीत आले होते. लोकसभेचे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला कामाच्या व्यापामुळे अमित शाह यांचा दौरा थांबवावा लागला, म्हणून त्यांना येता आलं नसल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी
- Ajit Pawar Group X Account Suspended: अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड...