महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामती : अजित पवारांचा जनता दरबार; भेटण्यासाठी नागरीकांच्या रांगा - Ajit Pawar meet

बारामती (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.तत्काळ आदेश - मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो.

अजित पवारांना भेटण्यासाठी रांगा
अजित पवारांना भेटण्यासाठी रांगा

By

Published : Jun 12, 2021, 10:58 AM IST

Updated : Jun 12, 2021, 12:55 PM IST

बारामती(पुणे)- उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.

तत्काळ आदेश -

अजित पवारांचा जनता दरबार

मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरीकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

हेही वाचा- पंतप्रधानांशी भेट ही राज्याच्या प्रश्नांसाठीच; संजय राऊतांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Last Updated : Jun 12, 2021, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details