पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज पुणे महापालिकेत शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. सामान्य माणसाला पोटभर जेवण देण्यासाठी ही योजना आणली असून, ऐपत असणाऱ्यांनी याचा फायदा घेऊ नये असे अजित पवार म्हणाले. यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर सुधार करु, मात्र काही झालं तर लगेच ब्रेकींग देऊ नका, आमच्या लक्षात आणून द्या असे पवार म्हणाले.
मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज पुणे महापालिकेत शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. सामान्य माणसाला पोटभर जेवण देण्यासाठी ही योजना आणली असून, ऐपत असणाऱ्यांनी याचा फायदा घेऊ नये असे अजित पवार म्हणाले.
आम्ही कॉमन कार्यक्रमामध्ये शिवभोजन थाळी हा एक अजेंडा होता. त्याचा आज शुभारंभ करत आहे. सध्या 100 ते 150 थाळी देण्यात येणार आहेत.यात काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे. माञ वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांना शिवभोजण थाळी खाऊन शुभारंभ करण्याची विचारणा केली असता, ते म्हणाले, माझा दीक्षित डाएट सुरु आहे. मी जर ही थाळी खाल्ली तर गरिबांसाठी असलेलं जेवण अजित पवार जेवले, अशी बातमी ब्रेकिंग तुम्ही करणार अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी दिली.