महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार - पिंपरी विधानसभा मतदारसंघ

भाजप पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. 5 वर्षांपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र स्वप्न साकार झाली नाहीत, अशी भाजपवर टीका अजित पवारांनी केली.

अजित पवार

By

Published : Oct 15, 2019, 4:39 PM IST

पुणे- विरोधकांची बटणे दाबू नका, असे आम्ही घसा कोरडा करुन सांगतोय. मात्र, तुझ्या बोटातच घोटाळा आहे. तुझे बोटच तिकडे जाते अन् नंतर ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे म्हणतात, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते

यावेळी अजित पवार म्हणाले, सत्ताधारी हे सभेच्या अगोदरच आंदोलकांना बसवतात. यावर कार्यकर्त्यांनी ही 'हिट्लरशाही' असे म्हटले. त्यानंतर पवार म्हणाले, हुकूमशाही आहे, हिटलरशाही आहे. राज्यात तेच चालले आहे. काय म्हणायचे आहे म्हणा, फक्त विरोधकांचे बटण दाबू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

हेही वाचा -राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात

भाजप पक्ष हा केवळ बोलघेवड्यासारखा बोलत असतो. 5 वर्षांपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र स्वप्न साकार झाली नाहीत. भाजपच्या 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहेत. त्याचे पुरावेही दिले होते. तरीहि अनेकांना क्लीनचिट दिली गेली असल्याचे पवार यांनी सांगितले.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकीट का नाकारले? हे नागरिकांना कळू द्या. तुमचा कारभार एवढा चांगला होता तर यांना का तिकीट नाही दिल? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - ज्यांचे 'घड्याळ' बंद पडले त्यांना वेळेचे महत्व काय कळणार; स्मृती इराणींचा राष्ट्रवादीवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details