महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar : अजित पवारांनी पुरविला 3 वर्षीय चिमुकलीचा हट्ट, वाचा सविस्तर - Ajit Pawar

अजित पवार हे शुक्रवार (20 जानेवारी) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाला आले होते. या कार्याक्रमानंतर अजित पवार यांनी स के डी ग्रुप च्या कार्यालयाला भेट दिली. भेटी दरम्यान सुभाष गव्हाणे यांची तीन वर्षीय क्रीतिका हिने पवार यांना ओवाळून झाल्यानंतर तिने दादांना कुंकू लावायला हात पुढे केला. पण अजित दादा यांनी त्या चिमुरडीला मला अलर्जी आहे असे गंमत म्हणून सांगितले. अखेर मुलीच्या पवारांनी निरागसतेमुळे त्या चिमुरडीला कुंकू लावण्याचे सांगितले.

Ajit Pawar
अजित पवारांनी पुरविला 3 वर्षीय चिमुकलीचा हट्ट

By

Published : Jan 22, 2023, 10:41 PM IST

अजित पवारांचे औक्षण करताना छोटीशी चिमुकली

पुणे : पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद, गोहत्या,छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. नेहमी सार्वजनिक कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार हे कुंकू लावत नसल्याचे दिसून येतात. पण काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात एका लहान मुलीच्या हट्टापायी अजित पवार यांनी कुंकू लावल्याच पाहायला मिळालं.


चिमुरडीचा हट्ट पुरवला : अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाला आले असताना कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एसकेडी ग्रुप च्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीत पवार हे कार्यालयात आल्यानंतर सुभाष गव्हाणे यांची तीन वर्षीय क्रीतिका हिने पवार यांना ओवाळून झाल्यानंतर तिने दादांना कुंकू लावायला हात पुढे केला.

चिमुरडीने लावला कुंकू : अजित पवारांनी मला एलर्जी असल्याचे चिमुरडीला सांगितले. पण समोर उभी असलेल्या निरागस मुलीकडे पाहून दादा म्हटले लावून टाक आणि त्या छोट्याश्या मुलीने अजित पवार यांना कुंकू लावून औक्षण केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पवार यांचा दुसरा रूप देखील आता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :Punyeshwar Temple Pune : सरकारने पुण्यश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करावे; तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details