महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना प्रतिबंधासाठी 'हॉटस्पॉट' भागांवर अधिक लक्ष केंद्रित करा' - pune corona update

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाय-योजनांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अजित पवार
अजित पवार

By

Published : May 1, 2020, 5:36 PM IST

पुणे - कोरोना रुग्णांची संख्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असून ही चिंतेची बाब आहे. 'बारामती पॅटर्न'नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथे दिले.

येथील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून समन्वयाने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाय-योजनांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  • अजित पवार यांच्या सूचना/निर्देश
    1 बारामती पॅटर्ननुसार कडक निर्बंध पाळून पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घाला
    2 कोरोना प्रतिबंधासाठी हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा
    3 पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कंटेंटमेंट भागासाठी सुक्ष्म नियोजन करा
    4 दाट लोकवस्तीमधील नियंत्रणासाठी स्वच्छतेवर भर द्या
    5 'रेड झोन'मधील नागरिक ये-जा करू नयेत, यासाठी पोलिसांनी तपासणी वाढवावी
    6 अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी
    7 नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

ABOUT THE AUTHOR

...view details