पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधी, कुठं, काय बोलतील याचा नेम नाही. शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर वीज माफीचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आता सगळंच जर माफ करायला लागलो तर, कपडे काढून मला जावे लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायच असे स्पष्टीकरण यावेळी पवार यांनी यावेळी दिले.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये २ लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार असून, त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आजच त्यावर निर्णय घेणार असून, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी नियमीत कर्ज भरत असतात. त्यांच्यासाठीही चांगल्या पद्धतीची मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, गंभीर होत चालला असताना सर्वसामान्यांना जगणं महागात पडले आहे. राज्यात सीएए, एनआरसीच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी दुसरेच मुद्दे पुढे आणले जातात. यामधून जातीय वाद निर्माण करून तेढ निर्माण होत होण्याची भीती अजित पवारांनी व्यक्त केली.