महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर बायको मला घरातून हाकलूनचं देईल

सरकारी निवासस्थान लवकर मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खंत व्यक्त केली. सरकार येऊन १०० दिवस होत आले तरी शासकीय बंगला रिकामा होईना, असे वक्तव्य अजित पवारांनी केले.

Ajit pawar comment on Government bungalow
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Feb 15, 2020, 8:05 AM IST

Updated : Feb 15, 2020, 8:16 AM IST

पुणे - बारामतीतले कार्यकर्ते कामानिमित्त मुंबईत आले की, मी नाराज होतो. कारण मुंबईतील घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरुमध्ये बसवावे लागते. आता माझ्याच बेडरुमध्ये लोक बसायचे बाकी राहिलेत. तिथे लोकांना बसवले की, बायको मला बाहेर हाकलूनच देईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सरकार येऊन १०० दिवस होत आले तरी शासकीय बंगला रिकामा होईना, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारी निवास मिळत नसल्याने खंत व्यक्त केली. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवारांनी व्यक्त केली खंत

महाविकास आघाडीचे सरकार येऊन १०० दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक अशा शब्दात अजित पवार यांनी शासकीय निवासस्थान रिकामं होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मुळात आत्ताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावे लागते. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचचं राहिलं असल्याचे अजित पवार म्हणाले.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचा जागेवर राजीनामा घेऊ, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. त्याचवेळी निवडणुकी दरम्यान काहीजण गमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं, अन्यथा आपण गमती जमती सुरु केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

Last Updated : Feb 15, 2020, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details