पिंपरी-चिंचवड (पुणे) - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री हे एका व्यासपीठावर येणार असल्याने कालपासून ब्रेकिंग न्यूज सुरू असते. मात्र, राजकीय भूमिका, मत ही वेगवेगळी असू शकतात. परंतु निवडणूक झाल्यानंतर हा सत्ताधारी, तो विरोधी पक्षाचा अशाप्रकारचा भेदभाव न करता संकटात एकत्रित काम केले पाहिजे, अशी परंपरा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले की ब्रेकिंग न्यूज'
कोरोना विरुद्धची लढाई केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वांनी मिळून एकजुटीने लढायचे आहे. सोबत मिळून काम केले तरच आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे आम्ही आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला एकत्रित आलो आहोत. आम्ही दोघे कार्यक्रमाला एकत्रित येणार असे माहित होताच काल पासून ब्रेकिंग न्युज सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.
पिंपरी ऑटो क्लस्टर येथे महानगरपालिकेकडून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कोरोना विरुद्धची लढाई केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वांनी मिळून एकजुटीने लढायचे आहे. सोबत मिळून काम केले तरच आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे आम्ही आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला एकत्रित आलो आहोत. आम्ही दोघे कार्यक्रमाला एकत्रित येणार असे माहित होताच काल पासून ब्रेकिंग न्युज सुरू आहे. चंद्रकांत पाटील हे येणार माहिती नव्हते, अन्यथा ते ही नाव आले असते, असे अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मला एक कळत नाही. राजकीय भूमिका, मते ही वेगवेगळी असू शकतात. परंतु, निवडणूक झाल्यानंतर हा सत्ताधारी तो विरोधी पक्षाचा अशाप्रकारचा भेदभाव न करता संकटाच्या वेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा काही चुकत असेल तर ती नजरेत आणून देणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.