बारामती- नाविन्यपूर्ण शेतीचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा तसेच शेतमालाच्या उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या हेतूने अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित प्रतिवर्षी कृषिक कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन केले जाते. या कृषी सप्ताहाचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांसह इतर राज्यातील हजारो शेतकरी भेट देत असतात. कृषी सप्ताहाची माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, कृषीमंत्री दादा भुसे, आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार हेही उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला शरद पवार आणि कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित प्रतिवर्षी कृषिक कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन केले जाते. या कृषी सप्ताहाचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांसह इतर राज्यातील हजारो शेतकरी भेट देत असतात. कृषी सप्ताहाची माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, कृषीमंत्री दादा भुसे, आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये 110 क्षेत्रावर भाजीपाला व फुलांचे नाविन्यपूर्ण जातींची लागवड, संरक्षित शेतीचे विविध प्रयोग, खते देण्याच्या विविध पद्धती, एकात्मिक शेती प्रकल्प, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, मोत्याची शेती, प्रक्रिया युक्त पदार्थ निर्मिती, नाविन्यपूर्ण स्टार्टअप इंनोवेशन्स विविध जातिवंत जनावरे आणि पशुपक्ष्यांचे दालन, भरड धान्याच्या विविध जाती आणि त्याचे प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात मार्गदर्शन, औषधी वनस्पती लागवड, भाजीपाला कलमी रोपे, जातिवंत कलमी रोपांची फळरोपवाटीका, देश-विदेशातील न्यानो तंत्रज्ञान, देशी-विदेशी भाजीपाला, अत्याधुनिक मशनरी, ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान, सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर, टिशू कल्चर रोपे निर्मिती इत्यादी तंत्रज्ञान पाहून एकाच ठिकाणी शेती व निगडित व्यवसाय पाहण्यासाठी यंदा ही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मंत्री दादा भुसे, यांनी ड्रोनद्वारे फवारणी तंत्रज्ञान, ट्रॅक्टर मशीन द्वारे कांदा रोप लागवड, यासारख्या मजुरीवरील खर्च कमी करणाऱ्या तंत्रज्ञान तसेच पशुपक्षी दालनांमध्ये देशी गाईंच्या विविध प्रकार विविध प्रजाती पाहण्याबरोबरच खिलार,लालकंधारी, देवनी,थारपार्कर, गीर, शेळ्या-मेंढ्या- बिटल आणि बोर, कुत्र्यांमध्ये जर्मन शेफर्ड, कारवान, पामेरियन, कोंबड्या टर्की, वनराजा, कावेरी, ब्लॅक अस्टा लाफर, मुरघास तंत्र , सायलेज मेकिंग, टोटल मिक्स रेशनची पाहणी केली..हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सुरू झाला असून रविवार 13 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे.