पुणे - महाराष्ट्रासारख्या शेती प्रगत राज्यातील शेती तंत्रज्ञान शेती पूरक उद्योग तसेच डेरीमधील तंत्रज्ञान काश्मीरमध्ये आणले गेले तर आम्हाला नक्कीच फायदा होईल, असे मत काश्मीरमधून पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या काश्मिरी शेतकऱ्यांनी मांडले आहे.
हेही वाचा -काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातून पुणे परिसरातील प्रगतशील शेती व्यवसायांचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी आले आहेत. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर आता विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. डोडा जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शेतकरी डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेथील कृषी अधिकारीऱ्यांच्या प्रयत्नाने पुण्यात अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. 8 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत हे शेतकरी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालय जुन्नर येथील अत्याधुनिक डेरी फार्म फ्लोरिकल्चर तळेगाव येथील भाजी आणि फुलोत्पादन संस्था, सहकारी संस्था, सहकारी बँका अशा विविध ठिकाणी या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.