पुणे :राज्यपालांची हकालपट्टी न झाल्यास येणाऱ्या काळात राज्यपालांचे कार्यक्रम उधळू व राजभवनाला कुलुप लावू, असा इशारा स्वराज्य संस्थेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे. राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरचा महाराष्ट्रातील दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असून आज स्वराज्य संस्थेतर्फेधोतरावर सही करून, घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारींविरोधात 'स्वराज्य' चे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले (Agitation of Swarajya Sangathana at Pune) आहे.
Agitation of Swarajya Sangathana : धोतरावर सही करून स्वराज्य संघटनेचे आंदोलन ; राजभवनाला कुलुप लावण्याचा इशारा - डॉ धनंजय जाधव
राज्यपालांची हकालपट्टी न झाल्यास येणाऱ्या काळात राज्यपालांचे कार्यक्रम उधळू व राजभवनाला कुलुप लावू, असा इशारा स्वराज्य संस्थेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (controversial statement about Shivaji Maharaj) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निवेदन देण्यात (Agitation of Swarajya Sangathana at Pune) आले.
आंदोलन करून निवेदन :छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. धोतरावर सही करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात (Koshyari controversial statement) आला.
राजभवनाला कुलुप लावण्याचा इशारा :'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देवून आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न केल्यास येणाऱ्या काळात राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावू तसेच राजभवनाला कुलुप लावण्याचा इशारा यावेळी स्वराज्यचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला (Agitation of Swarajya Sangathana) आहे.