पुणे - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावेत. यासाठी शिवसेनेच्या वतीने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 17 जुलैला मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याच धर्तीवर शिवसेना पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवरही मोर्चे काढणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना विम्याचे पैसे द्या, पीक विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेना उतरणार मैदानात - crop insurance
पुणे शहरात बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या येरवडा येथील मुख्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक आणि शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहरातही बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या येरवडा येथील मुख्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक आणि शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
या मोर्चात शिवसेनेचे शिष्टमंडळ पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारणार आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. अन्यथा पीक विमा कंपन्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.