पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या ग्रामस्थांचे आंदोलन
इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुण्याच्या विधानभवनासमोर निदर्शने केली. खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या २७ गावांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत खडकवासला धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली.
पिण्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या ग्रामस्थांचे आंदोलन
पुणे -इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी पुण्याच्या विधानभवनासमोर निदर्शने केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक सुरू असताना इंदापूरच्या ग्रामस्थांनी ठिय्या मारून घोषणाबाजी केली.
खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. मात्र, इंदापूरमधील या २७ गावांना पिण्यासाठी देखील पाणी नाही. अशा परिस्थितीत खडकवासला धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.