महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले, हेच का अच्छे दिन!- रुपाली चाकणकर - pimpari latest news

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

agitation against inflation under the guidance of Rupali Chakankar in Pimpri
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन

By

Published : Feb 28, 2021, 3:56 PM IST

पुणे (पिंपरी) - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनर खाली चूल आणि गॅस मांडून हे आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले, हेच का अच्छे दिन!- रुपाली चाकणकर
दरवाढीने महिला आणि नागरिकांचे कबरडे मोडले-
रुपाली चाकणकर यांनी विविध मुद्दे मांडत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ दररोज होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे महागाई ने कंबरडे मोडले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात तीन वेळेस गॅस दरवाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांचं आर्थिक गणित बिघडली असून ही दरवाढ सहन केली जाणार नाही असं त्यांनी ठणकाहून सांगितले आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे.
जाहिरात करून पंतप्रधान दिशाभूल करत आहेत-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागरिकांच्या करातून मिळालेल्या पैशांमधून पेट्रोल पंपांवर जाहिरात करतात. त्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आहेत. एकीकडे उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस आणि शेगडी द्यायची. अन् दुसरीकडे गॅस दरवाढ करायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात गॅस दरवाढीमुळे महिला चुली वापरत असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यावर आम्ही गप्प बसणार नसून राज्यभर हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details