महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आशिष शेलारांविरोधात पुण्यात शिवसेनेची निदर्शने - पुण्यात शिवसेनेची निदर्शने

आमदार अशिष शेलार यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत पुण्यातील शिवसैनिकांनी निदर्शने केली. स्वारगेट चौकात गाढवाचे चित्र असलेला फलक लावून त्यावर आशिष शेलारांचा फोटो लावत त्यांच्या वक्तव्याचा निषेध शिवसैनिकांकडून करण्यात आला.

निदर्शने करताना शिवसैनिक
निदर्शने करताना शिवसैनिक

By

Published : Feb 5, 2020, 1:32 PM IST

पुणे- "सुधारित नागरिकत्व कायदा हा केंद्राचा निर्णय आहे, हे राज्य काय तुझ्या बापाचं आहे?" असे वक्तव्य आशिष शेलारांनी केले होते. त्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध केला जात आहे. पुणे शहरातही शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

निदर्शने करताना शिवसैनिक

पुण्यातील स्वारगेट चौकात गाढवाचे चित्र असलेला फलक लावून त्यावर आशिष शेलारांचा फोटो लावत त्यांच्या वक्तव्याचा निषेध शिवसैनिकांकडून करण्यात आला. यावेळी शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आशिष शेलारांनी वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. सत्ता गेल्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. तसेच आशिष शेलारांनी यापुढे अशी वक्तव्य केली तर त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. यावेळी आशिष शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - पुण्यात चाललंय काय! सिंहगड रस्ता परिसरात चाळीस दुचाकी अज्ञाताने दिल्या ढकलून

ABOUT THE AUTHOR

...view details