महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navale Bridge Accident: पुन्हा नवले पुलाजवळ अपघात; 4 जखमी, 15 दिवसांपासून अपघाताचा सत्र सुरूच - Sinhagad Road Police

Navale Bridge Accident: मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सध्या सुरूच आहे. बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर पलटी झाली आहे. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील 4 जण जखमी झाले आहे.

Navale Bridge Accident
Navale Bridge Accident

By

Published : Nov 30, 2022, 9:59 AM IST

पुणे: मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर पलटी झाली आहे. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडले आहे.

पुन्हा नवले पुलाजवळ अपघात; 4 जखमी, 15 दिवसांपासून अपघाताचा सत्र सुरूच

अपघातांचा सत्र अजूनही सुरू:गेल्या 15 दिवसांपासून पुण्यातील नवले ब्रिजवर दिवसाआड अपघात होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकांनी तब्बल 48 हून अधिक गाड्यांना उडवल होत. त्यानंतर सातत्याने याच ब्रिजवर दिवसाढ अपघातांचा सत्र अजूनही सुरू आहे. प्रशासनाच्या बैठका घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शी फिल्डवर येऊन देखील कोणतेही उपाययोजना होताना दिसून येत नाही. आज झालेल्या अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस Sinhagad Road Police तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त: पीकअप वाहनचालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे आमचे वाहन पलटी झाली आहे. गेल्या आठवड्यात 7 दिवसांत 8 अपघात या परिसरात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पहावयाला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details