महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Traffic Jam Lonavala : लोणावळ्यात पर्यटनाच्या बंदीनंतरही मोठी गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी - अतिवृष्टीमुळे लोणावळा बंदी

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात ( Large crowd in Lonavala ) दाखल झाले आहेत. सहारा ब्रिज येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. परवानगी असेल तरच पर्यटकांना पोलीस पुढे सोडत आहेत. पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केले आहे

लोणावळा वाहतूक कोंडी
लोणावळा वाहतूक कोंडी

By

Published : Jul 17, 2022, 3:57 PM IST

Updated : Jul 17, 2022, 4:05 PM IST

पिंपरी-चिंचवड -हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर देखील लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांना जाण्यास लोणावळा पोलिसांनी मज्जाव केला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात ( Large crowd in Lonavala ) दाखल झाले आहेत. सहारा ब्रिज येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. परवानगी असेल तरच पर्यटकांना पोलीस पुढे सोडत आहेत. पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक


लोणावळ्यात पर्यटन बंदी असल्याने पर्यटनस्थळ निर्मनुष्य दिसत आहेत. नेहमी सहारा ब्रिजवर पर्यटकांची गर्दी असते. आज मात्र शुकशुकाट होता. लोणावळ्यात विकेंडला हजारो पर्यटक दाखल होतात. जिल्ह्यधिकाऱ्यांच्या आदेशांतर गेल्या तीन दिवसंपासून पर्यटकांना पर्यटनस्थळी बंदी घालण्यात आली आहे. भुशी धरण परिसरात शुकशुकाट आहे. विकेंडमुळे लोणावळ्यात मोठी गर्दी झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर दिसून येत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नारायणी धाम ते कुमार चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली असून लोणावळा पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवताना कसरत करावी लागते आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

हेही वाचा -Cracks On Kasara Ghat: कसारा घाटातून प्रवास करताना सावधान! रस्ता खचतोय, महामार्गाला तडे

Last Updated : Jul 17, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details