महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्य सचिवांच्या बैठकीनंतर मराठा आक्रोश आंदोलन मागे - मराठा आरक्षण बातमी

मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय, अशी पायी वारी काढण्यात येणार होती. मात्र, यास परवानगी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी वाहनांतून मुंबईकडे कूच केली. पण, राज्याच्या मुख्यसचिवांनी त्यांना पुण्यातच थांबवून चर्चा केली व अचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्री भेटतील, असे आश्वासन दिले.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Nov 7, 2020, 9:51 PM IST

Updated : Nov 7, 2020, 10:56 PM IST

पुणे -आचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी बैठक घेणार, असे आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांनी कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांना पुण्यातच थांबवण्यात आले आहे.

माहिती देताना मराठा मोर्चा समन्वयक

आरक्षणाबाबतमराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मुंबई, अशी पायी वारी काढण्याचा प्रयत्न मराठा समाजातील आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, पायी वारीची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर तीन चारचाकी वाहनांतून कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात पुण्यात आले. अचारसंहिता असल्याने मुंबईमध्ये मुख्यमंत्री भेटू शकत नव्हते. त्यामुळे राज्याचे मुख्यसचिवांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. यावेळी मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन मुख्य सचिवांना देण्यात आले. सोमवारी (दि. 9 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मांडणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांना पुण्यात थांबवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सोमवारी काय सांगतात त्यावर पुढील दिशा ठरवली जाईल, असे आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही

Last Updated : Nov 7, 2020, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details