पुणे -शहरातील खराडी येथील मदरहुड रुग्णालयामध्ये एका जोडप्याला त्यांच्या १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर नवव्या प्रयत्नामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे.
संबंधित दाम्पत्याने यापूर्वी अनेकदा बाळासाठी दिल्ली आणि पुण्यामध्ये विविध ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटही घेतली होती. मात्र, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्समुळे गर्भवस्था पार करण्यात काही समस्या निर्माण होता होत्या, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रसुतीतज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी दिली.
पुण्यात तब्बल १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर दाम्पत्याला अपत्य प्राप्ती - maharashtra
एका जोडप्याला त्यांच्या १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर नवव्या प्रयत्नामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे. बाळाच्या आगमनामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे, अशी भावना बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाच्या आगमनामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे, अशी भावना बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स काय आहे?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स ही समस्या सर्वसाधारणपणे १ टक्का महिलांमध्ये आढळून येते. ही समस्या निर्माण होण्याचे नेमके असे कोणते कारण सांगता येत नाही. यावर गर्भावस्थेत स्त्रीच्या मेडिकल हिस्टरीनुसार उपचार करून बाळाला यशस्वीरित्या जन्म देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी गर्भावस्थेत स्त्रीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे.