पुणे - शहरातल्या आठ मतदारसंघात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी घसरली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात सरासरी ४५ टक्के मतदान झाले आहे. लोकसभेला ४७.९७ टक्के मतदान झाले होते.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पुणेकर मतदानाबाबत निरुत्साही
शहरातल्या आठ मतदारसंघात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी घसरली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात सरासरी ४५ टक्के मतदान झाले आहे. लोकसभेला ४७.९७ टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा - बीडमध्ये बोगस मतदारांवरुन राडा, मतदारांना अडवून दमदाटी
पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. मात्र, शहरात विचीत्र परिस्थिती आहे. पुणेकरांनी पुन्हा एकदा मतदानाबाबत अनुत्साह दाखवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ही बाब समोर येत आहे. शहरात सर्वात कमी मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८ टक्के तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारंसघात ३८.१४ टक्के मतदान झाले आहे. इतर ही मतदारसंघात सायंकाळी पाच पर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कुठलाही मतदारसंघ गेलेला नाही.
पुणे शहर मतदारसंघ | मतदान टक्केवारीमध्ये (सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी) |
शिवाजी नगर | 39.20 |
कोथरूड | 43.23 |
खडकवासला | 49.5 |
पर्वती | 45.07 |
हडपसर | 48.84 |
पुणे कॅन्टोन्मेंट | 38.14 |
कसबा | 36.08 |
वडगावशेरी | 41.08 |