पुणे - काल (शुक्रवार) राज्यभर बैलपोळा हा सण साजरा झाला. पोळा सणाच्या दिवशी ज्या बैलांची पुजा केली, तेच बैल चाकणच्या बाजारात विक्रीसाठी आले. अगोदर दुष्काळी परिस्थिती व सध्याची अतिवृष्टी यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेली जनावरे बाजारात विकावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
बैलपोळा साजरा; मात्र, दुसऱ्याच दिवशी बैल बाजारात विक्रीला - Bull in market for saling in pune
बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवून गोड-धोड पुरणपोळीचा नैवद्य देऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा सोबती मानला जातो. दिवसभर शेतकऱ्यांसोबत बैल काबाडकष्ट करतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना बैलांचा व पाळीव जनावरांच्या संगोपनाचा वाढता भार शेतकऱ्यांना सहन होत नाही. त्यामुळे पर्यायाने पाळीव जनावरांची व बैलांची विक्री करावा लागत आहे.
बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजवून गोड-धोड पुरणपोळीचा नैवद्य देऊन संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा सोबती मानला जातो. दिवसभर शेतकऱ्यांसोबत बैल काबाडकष्ट करतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना बैलांचा व पाळीव जनावरांच्या संगोपनाचा वाढता भार शेतकऱ्यांना सहन होत नाही. त्यामुळे पर्यायाने पाळीव जनावरांची व बैलांची विक्री करावी लागत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो. त्यासाठी दुभत्या गायी-म्हशींचे संगोपन करतात. त्यातून शतकऱयांना दुधाचे चांगले उत्पन्न मिळते. मात्र, सध्या वातावरणातील बदल, दुष्काळी परिस्थिती व चाऱ्याचा अभाव यामुळे दूध उत्पादनामध्ये ही घट झाली आहे.