पुणे - हैदराबाद येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरचे समर्थन होऊ शकत नाही. आपल्याला कायद्याचे राज्य ठेवायचे आहे की नाही? बलात्कारातील आरोपींना तत्काळ शिक्षा होत नसल्याने जनतेच्या भावना तीव्र होणे साहाजिकच आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. आता न्यायव्यवस्थेला सुधारणा करण्याची गरज आहे, न्यायव्यवस्थेचे हे अपयश आहे का? असा प्रश्न मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे.
हैदराबाद एन्काऊंटर: पोलिसांनी कायदा हातात घेणे हे न्यायव्यवस्थेचे अपयश - असीम सरोदे - Advocate asim sarode on hyderabad encounter in pune
पोलीस कायदा हातात घेऊन जर न्याय देत असतील तर न्याय व्यवस्थेची गरज काय? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
पोलीस कायदा हातात घेऊन जर न्याय देत असतील तर न्याय व्यवस्थेची गरज काय? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो, असेही ते म्हणाले. तसेच भारतीय घटनेनुसार न्याय देण्याची प्रक्रिया ही न्यायालयाची आहे. मात्र, पोलीस जर न्याय देऊ लागले तर आपल्याला कुठले राज्य निर्माण करायचे आहे हे समजत नसल्याचेही ते म्हणाले. बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे, नाहीतर अशाप्रकारे जगभरात बंदी असलेल्या एन्काऊंटरसारख्या घटना लोकशाहीसाठी योग्य नाहीत, असेही ते म्हणाले.