महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीच्या निर्भया पथकाची कौतुकास्पद कामगिरी - baramati special story

बारामतीच्या निर्भया पथकाच्या चार वर्षातील कामगिरीचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला आढावा...

निर्भय पथकाची कामगिरी
निर्भय पथकाची कामगिरी

By

Published : Jan 1, 2021, 7:49 PM IST

Updated : Jan 1, 2021, 10:42 PM IST

बारामती - महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने तसेच महिलांवरील अत्याचार, लैंगिक छेडछाड आदी गुन्हे रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यात निर्भया पथक कार्यरत आहे. यासंदर्भात बारामती येथील निर्भया पथकाने महिला व मुलींना निर्भय करण्यासाठी मागील चार वर्षात केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे. याबाबत निर्भया पथकाने केलेल्या कामगिरीचा ईटीव्ही भारत ने घेतलेला हा विशेष आढावा

अमृता भोईटे
राज्यातील महिला अत्याचार रोखण्यासाठी तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सन २०१६ साली तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची संकल्पना मांडली होती. त्यानुसार राज्यभरातील पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकामुळे बऱ्याच अंशी महिलांसंदर्भातील गुन्ह्यांना आळा बसण्यास यश आल्याचे दिसते. सहा हजार हॉटस्पॉटला भेटी-बारामतीच्या निर्भया पथकाने मागील चार वर्षात बारामती शहर आणि ग्रामीण भागातील महिलांची छेडछाड अत्याचार होणाऱ्या जवळपास सहा हजार ठिकाणच्या हॉटस्पॉट ठिकाणाला भेट दिली आहे. तसेच या दरम्यान ७०० हून अधिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून महिलांना निर्भय करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वसंरक्षणासह प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण-बारामती, व इंदापूर शहरातील शाळा महाविद्यालया बरोबरच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुली व बचत गटातील महिलांना सक्षम बनविणे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, मुला-मुलींबद्दल एकमेकांच्यात आदर निर्माण करणे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर एखाद्यावेळेस छेडछाडी सारखा प्रसंग ओढवल्यास स्वतःच्या बचावा बरोबरच त्याला प्रतिकार करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. मुलींना पूर्णतः निर्भय करण्याच्या दृष्टीने निर्भया पथकाकडून काम केले जात आहे.चारशे तुटलेले संसार जोडले-बारामती आणि इंदापूर मधील कौटुंबिक कलहामुळे दहा ते बारा वर्षापासून मोडलेले संसार तसेच विभक्त होण्याच्या मार्गावर असणारे संसार समुपदेशन करून पुन्हा जोडली गेली. निर्भया पथकाच्या माध्यमातून असे चारशे विभक्त कुटुंब पुन्हा एकत्रित नांदत आहेत, अशी माहिती निर्भया पथकाच्या सदस्या अमृता भोईटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.मित्रत्वाचे नाते जोपासले-शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यात मित्रत्वाचे नाते आत्मसात केले. त्यामुळे मुलींची ठिकठिकाणी होणारी छेडछाड तसेच महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, छळ, याला आळा बसला आहे. बारामती व इंदापूर मधील पुरुषांकडून विवाहित महिलांची छेड काढली जात होती. मात्र त्या महिलाकडून आपल्या घरी व पोलिसांनाही याबाबत सांगू शकत नव्हत्या. मात्र निर्भया पथकाने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. व संबंधित छेड काढणार्‍यांना समज दिली व काहींना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला.

हे सांभाळत आहे पथकाची धुरा-

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्भया पथक काम करत आहे. या पथकाच्या प्रमुख महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, असून पोलीस कर्मचारी अमृता भोईटे हे या पथकाची धुरा सांभाळत आहेत.

बारामती उपविभागातील निर्भया पथकाची माहिती ( सन २०१६ ते २०२० )

तपशील भेट दिलेले हॉटस्पाॅट ११०,११२ प्रमाणे कलेली कारवाई प्रबोधात्मक कार्यक्रम शाळा,कॉलेज भेट समुपदेशन कोर्टात खटला वाहतुक केसेस कलम ३५४ प्रमाणे
अदखलपात्र अहवाल व चॅप्टर केसेस
२०१६ २२५ १४१ २२ ४० १४१
०० ०० ०१ ००
२०१७ १०९४ ४४६ २५ ७५ ४४६ ०६ ०० ०२ ०४
२०१८ १९८० ६४२ ९५ ३३१ ८९५ १९ २३२ ०० ०२
२०१९ १७११ ४१६ ९८ ३४४ ५७४ ०० १४६ ०० ००
२०२० ९२९ १५६ ११७ २०० १८६ ०२ ०० ०० ००
एकूण ५९३९ १८०१ ३५७ ९९० २२४२ २७ ३७८ ०३ ०६



हेही वाचा-ईडीकडून संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त

Last Updated : Jan 1, 2021, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details