महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनेक पक्ष दिल्लीपुढे झुकतात पण शिवसेना दिल्लीला झुकवते - आदित्य ठाकरे - delhi

शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने ध्वजारोहण, पोवाडे गायन कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा असे कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

आदित्य ठाकरेंनी घेतले शिवाजी महाराजांचे दर्शन

By

Published : Mar 23, 2019, 2:18 PM IST

पुणे - अनेक पक्ष दिल्ली दरबारी झुकतात पण शिवसेना हे दिल्लीला झुकवते, असे वक्तव्य युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आदित्य ठाकरेंनी किल्ले शिवनेरीवर गडावर जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.

आदित्य ठाकरेंनी घेतले शिवाजी महाराजांचे दर्शन


शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने ध्वजारोहण, पोवाडे गायन कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा असे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येने शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी खासदार शिवाजी आढळराव-पाटीलही उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, इतर पक्ष दिल्लीला झुकतात पण शिवसेना हा पक्ष दिल्लीला झुकवतो, या ठिकाणी आल्यावरती एक प्रेरणा मिळते, असे आदित्य ठाकरे यांनी शिवनेरी गडावरून बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details