पुणे :राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टिका केली जात (Aditya Thackeray criticized Shinde government) आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले (Aditya Thackeray on Airbus project) आहे. ते म्हणाले की- काल त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. आज दिली आहे. जस त्यांना वेदांतबाबत माहीत नव्हते, तस एअरबसबाबत देखील माहीत नसेल. त्यांनी एका वृत्तवाहिनीत म्हटले आहे की- एअरबस हा प्रकल्प आम्ही राज्यात आणू. मग त्यांनी राज्याशी आणि राज्यातील जनतेशी गद्दारी का केली ? राज्याचे मंत्री का खोटं बोलत आहे? अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली.
चौथा प्रकल्प राज्याबाहेर :माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की- हा चौथा प्रकल्प होता जो राज्यातून निघून गेला. मी या प्रकल्पासाठी 3 ते 4 महिन्यापासून सांगत आहे, की यासाठी प्रयत्न करावे. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री म्हणाले की- एअरबस प्रकल्प (Airbus project) आम्ही महाराष्ट्रात आणुच, पण तो प्रकल्प आता राज्यातून निघून गेला.
खोके सरकारवर विश्वास नाही :यावेळी ठाकरे यांनी सरकार समोर एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की 4 प्रकल्प राज्यातून निघून गेले आहे. सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना त्यांनी इज ऑफ कंप्लायनसाठी एक समिती तयार करण्यात आली होती. ही समिती राज्यात जे उद्योग आहे, ते तरी या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ नये. यासाठी ती समिती तयार करण्यात आली होती. या समितीची अजूनही तीन महिन्यात एकही बैठक झाली नाही. या खोके सरकारवर राज्यातील कुठल्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही. म्हणून प्रत्येक उद्योग हे आपल्या राज्यातून बाहेर जात आहे. असे देखील यावेळी ठाकरे (Aditya Thackeray on Airbus project) म्हणाले.