पुणे: आज देशात लोकशाही संपवण्याचा वातावरण निर्माण केले जात आहे. देशातील भाजपच सरकार आहे की, राज्यात गद्दारांचे सरकार आहे. त्यांना या देशातील संविधान आणि लोकशाही हे संपवायच आहे. त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे त्यांना बदलायच आहे. त्यामुळे हे धर्मा धर्मात वाद निर्माण करून स्वतःच प्रचार आणि स्वतःची पोळी भाजण्याच काम करत आहे. मला खात्री आहे की, पुण्याची जनता याला बळी पडणार नाही. देशाला जेव्हा जेव्हा गरज भासली आहे. तेव्हा तेव्हा पुण्याने मार्ग दाखवला आहे. आज देखील देशाचे संविधान वाचविण्यासाठी पुणेकर हे पुढे असतील, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
निलम गोऱ्हे यांच्या घरी भेट: आदित्य ठाकरे यांनी प्रचार सभेनंतर विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांना कसबा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराकडून चांदीचे वाटप करण्यात येत आहे. असे विरोधक म्हणत आहेत यावर विचारले असता, ते म्हणाले की काय आहे ना सध्या राज्यात स्वतःला खोके आणि राज्यातील जनतेला धोके अस राजकारण यांचे सुरू आहे. आम्ही लोकशाहीची लढाई लढत आहोत. त्यामुळे पुणे आणि चिंचवड येथील जनता महाविकास आघाडी बरोबर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडणूक आयोगाकडे:निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले की आता कसे झाले आहे ना, मुख्यमंत्र्यांना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील निवडणूक आयोगाकडे घेऊन जायचे होते. राज्यात सध्या सर्कस चालली आहे.आमची आपेक्षा ही निवडणूक आयोगाकडे नाही तर सर्वाच्चा न्यायालयाकडे आहे. आम्हाला न्याय मिळणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले.