महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात युतीमध्ये गिरीश बापट "शकुनीमामा", पराभवाचे खापर आढळराव पाटलांनी बापटांवर फोडले

विधानसभा निवडणूकीत भाजप -सेनेचा पुणे जिल्ह्यात पराभव गिरीश बापट यांच्यामुळे झाला असल्याची टीका शिवाजी आढळराव पाटील यांनी केली. ते चाकण येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

पराभवाचे खापर आढळराव पाटलांनी बापटांवर फोडले

By

Published : Nov 5, 2019, 12:39 PM IST

पुणे -लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती धर्म पाळत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं एकजुटीने काम केले. मात्र, आढळराव पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र सध्या विधानसभा निवडणुकीत युती धर्माचं पालन झालं नाही त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आणि याचं खापर भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्यावर फोडले जाते गिरीश बापट हे युतीतील "शकुनीमामा" असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बापटांना लक्ष करतात म्हणाले.

पराभवाचे खापर आढळराव पाटलांनी बापटांवर फोडले

गेल्या पंधरा वर्षापासून शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर शिरूर खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला मात्र या अपयशाचे खापर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी गिरीश बापटांवर फोडले आहे गिरीश बापट यांच्यामुळे युतीधर्म पाळला गेला नाही त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे हे गिरीश बापट म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी "शकुनीमामा" आहेत अशीच उपमा शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आढळराव पाटलांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details