महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बारामतीतील विकास कामांचा आढावा - baramati city news

अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी बारामती येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विकास कामे, कोरोनाची स्थिती याबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

बैठकीतील छायाचित्र
बैठकीतील छायाचित्र

By

Published : Oct 27, 2020, 10:40 PM IST

बारामती (पुणे)- विकास कामांचा आढावा व कोरोनाची सद्यस्थिती याबाबतची बैठक आज (दि. 27 ऑक्टोबर) अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी देशमुख यांनी बारामती तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे आणि उपअधिष्ठाता कुलकर्णी यांच्याकडून घेतली.

बारामतीमध्ये सुरू असलेली विकास कामे-साठवण तलाव, स्मशानभूमी, दफनभूमी, ड्रेनेज, रस्ते, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, नगरपालिका हद्दीतील चौक सुशोभिकरण, रिंग रोड, नीरा डावा कालवा सुशोभिकरण व त्यावरील सायकल ट्रॅक, ओपन जिम, नाना-नानी पार्क, विश्राम गृहाचे विस्तारीकरण, रूई, तांदूळवाडी व जळोची हद्दीतील रस्ते व क्रीडा विषयक विकासकामांची सादरीकरणाव्दारे माहिती घेवून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची एकत्रित माहिती सादर करण्यास सांगून महसूल विभागाने केलेल्या 75 टक्के पंचनाम्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी महसूल विभागातील प्रलंबित असलेल्या कामांची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. पावसामुळे तालुक्यातील झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबतची माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी शासनाच्या सुरू असलेल्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली.

हेही वाचा -जम्बो कोविड सेंटरमधून काढण्यात आलेल्या 'त्या' परिचरिकांचा अखेर पगार झाला!

ABOUT THE AUTHOR

...view details