महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Actress Priya Berde: पुण्यात मनोरंजनाच्या माध्यमातून 'आम्ही सारे सावरकर' कार्यक्रम - अभिनेत्री प्रिया बेर्डे - सावरकर गौरव यात्रा

पुण्यात भारतीय जनता पार्टी, सांस्कृतिक आघाडीच्या वतीने 'आम्ही सारे सावरकर ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकीकडे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजपाकडून आम्ही सारे सावरकर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील सावरकर अध्यासन केंद्रामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक आघाडी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केले आहे.

Actress Priya Berde
अभिनेत्री प्रिया बेर्डे

By

Published : Apr 3, 2023, 1:59 PM IST

प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्रिया बेर्डे

पुणे :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी सावरकरांविषयी अपमानजनक वक्तव्य केले, असा आरोप भाजपाने केला आहे. हिंदुत्ववादी सावरकर महाराष्ट्राला कळावे, यासाठी राज्य सरकार भाजप शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्राचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीत ठाण्यामधून सुद्धा सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती.





आम्ही सावरकरचे आयोजन :यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खूप काही बोलले जात आहे, ते स्वातंत्र्यवीर होते. समाजसेवक होते. हिंदुत्ववादी होते. सुधारणावादी होते. त्याचबरोबर ते कवी मनाचे होते, त्यांच्या मनामध्ये कवी मनाचा एक हळवा कोपराही होता. तो लोकांपर्यंत पोहोचावा, तरुण पिढीपर्यंत पोहोचवावा. त्यासाठी 'आम्ही सारे सावरकर' कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रिया बेर्डे म्हणाल्या आहेत. तरुण पिढीला सावरक काय ते माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा आणि सांस्कृतिक विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मनोरंजन माध्यमातून सावरकर :यावेळी सावरकरांची सगळी गाणी 'जयस्तुते ते सागरा प्राण तळमळला' पर्यंत सावरकरांचे स्वातंत्र्य समर गीत गायन करण्यात आले. सावरकरांविषयी होणारे राजकारण थांबवणे, हे माझ्या एकटीच्या हातात नाही. विरोध करणे, विरोधाला विरोध करणे ही एक वृत्ती झाली आहे. समाजामध्ये अशी व्यक्ती तयार झाली आहे. आपण चांगले काम करू सावरकरांचे काव्य, कर्तुत्व त्यांचे चरित्र छानपणे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून सावरकर लवकर कळतील, म्हणून संस्कृती विभागाने हा कार्यक्रम घेतला आहे.


कष्टाने स्वातंत्र्य मिळवून दिले :सावरकर काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी खूप हाल सहन केले. घाण्याला जसा बैल जुपला जातो, तसेच त्यांना घाण्याला जुपला गेले. त्या वेदना त्यांनी सहन केल्या आहे. या यातना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. ज्याने एवढ्या कष्टाने स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा व्यक्तीची आपण प्रतिमा कशी मलिन करू शकतो. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप सांस्कृतिक विभागाच्या प्रिया बेर्डे यांनी दिली आहे.



हेही वाचा : Savarkar Gaurav Yatra: राहुल गांधींच्या निषेधार्थ मुंबईत भाजपची सावरकर गौरव यात्रा, काँग्रेसही देणार यात्रेनेच उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details