पुणे- डॉ. लागूंच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला, मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी ते एक होते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिली. डॉ. लागू यांचे मंगळवारी (दि. 17 डिसें) निधन झाले. त्यानंतर पालेकर यांनी लागू यांच्या निवासस्थानी भेट दिली.
'मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक' - डॉ. लागू
डॉ. श्रीराम लागूंच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अंत झाला, मराठी रंगभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी ते एक होते, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दिली.
अमोल पालेकर
यावेळी, डॉ. लागू यांच्या काही आठवणींना उजाळा देताना पालेकर म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्याकडून मला नाटक अभिनयाबरोबर खूप काही शिकायला मिळाले. आयुष्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन देणारी शिवकवण ज्या लोकांनी दिली त्यामध्ये डॉ. लागू यांचे नाव अग्रगणी राहील.
Last Updated : Dec 18, 2019, 7:30 AM IST