पुणे - शहरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांना जबरदस्तीने बंद करायला सांगण्याचे प्रकार काही संघटना, कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. कुठल्याही कंपनीला किंवा संस्थेला बंद करण्यासंदर्भातील निर्णय हा प्रशासनाकडून घेतला जातो. त्याबाबत प्रशासन कारवाई करेल. मात्र, खासगी स्वरूपात अशाप्रकारे कोणी जबरदस्ती करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.
"आयटी कंपन्या बंद करण्याची जबरदस्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार" - force for shutdown it company's
शहरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांना जबरदस्तीने बंद करायला सांगण्याचे प्रकार काही संघटना, कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. कुठल्याही कंपनीला किंवा संस्थेला बंद करण्यासंदर्भातील निर्णय हा प्रशासनाकडून घेतला जातो.
आयटी कंपन्यांना जबरदस्तीने बंद करण्याला सांगण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बोलत होते. पुण्यातील आयटी कंपन्या आणि त्यांच्या संदर्भात प्रशासन संवेदनशीलपणे काम करत असून संपूर्ण आयटी कंपन्या बंद करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य होणार नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या 70 टक्के नेटवर्क डाटा हा पुण्यात असलेल्या कंपन्यांमध्ये असल्याने काळजीपूर्वक याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.
आताच्या परिस्थितीत या कंपन्यांना 50 टक्के मनुष्यबळ कमी करण्यास सांगितले असून, यापुढे 25% मनुष्यबळात त्यांनी काम करावं, अशा प्रकारचं नियोजन करण्यात येत आहे. आयटी कंपन्या संपूर्णपणे बंद केल्या तर मोठा गोंधळ उडू शकतो. बँकिंग, एलआयसी, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांचा विषय हा संवेदनशीलपणे प्रशासन हाताळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.