पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये वीस वर्षीय तरुण विराज विलास जगताप याची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी हे जेरबंद आहेत. मात्र, समाजात तेढ निर्माण करणारे काही मॅसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. जातीय तेढ निर्माण होईल, असे मॅसेज, व्हिडिओ हे टिक टॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसे आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.
विराज जगताप खून प्रकरण : जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार - पोलीस उपायुक्त - viraj jagtap murder case enquiry
८ जूनला विराजचा खून झाला. तांत्रिक आधारे गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे, की पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. घटनेचा तपास पुराव्यांच्या आधारावर होईल, असे आयुक्त ढाकणे म्हणाले.
८ जूनला विराजचा खून झाला. तांत्रिक आधारे गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की, पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. घटनेचा तपास पुराव्यांच्या आधारावर होईल, असे आयुक्त ढाकणे म्हणाले.
या घटनेप्रकरणी काही जण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सायबर सेल हे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. म्हणून जातीय तेढ निर्माण होईल, असे काही कृत्य करू नका. सोशल मीडियावर कॉमेंट, किंवा इतर गोष्टी प्रसारित करू नयेत. तसे कोणी केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.