पुणे - जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरोरोज पुण्यात 500 ते 600 नवीन कोरोना रुग्ण सापडत आहे. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुन्हा रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज मध्यरात्रीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्याप्रमाणावर पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाईस सुरू आहे. मात्र, असे असतानाही काही पुणेकर मात्र अजूनही निवांत असून रस्त्यावर विनामास्क फिरत आहेत. पुण्यात आज संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई, तर काहींना समज देऊन सोडण्यात आले. एकीकडे प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पुणेकर मात्र नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.
पोलिसांकडून चौका चौकात कारवाई -
कोरोना बधितांच्या रुग्णसंख्येत सुरवातीच्या काळात 4 टक्के वाढ होती. आता तो 10 टक्क्यांवर गेला आहे. शहरात मध्यंतरी एकही कंटेनमेंट झोन नव्हता. मात्र, आत्ता रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात 4 हून अधिक कंटेन्मेंट झोन तयार होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून प्रशासनाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पोलिसांकडून प्रमुख रस्ते तसेच चौकाचौकात कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी नाकेबंदी, तर काही ठिकाणी मार्शलद्वारे कारवाई करण्यात आली. संचारबंदीचे उल्लंघन केल्याने काही हॉटेल्सवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई -