पुणे -शांततेचा भंग केल्याप्रकरणी शहरातील मुंढवा आणि हडपसर परिसरातील आठ पब आणि हॉटेल विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने केली आहे.
शांतता भंग करणाऱ्या ८ पब आणि हॉटेल विरुद्ध कारवाई - song
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शहरातील मुंढवा आणि हडपसर परिसरातील आठ पब आणि हॉटेल विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने केली आहे.

शहरातील मुंढवा आणि हडपसर परिसरातील काही पब आणि हॉटेल निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणेच पबमध्ये मोठमोठ्या आवाजात गाणी वाजून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते.
याप्रकरणी नागरिकांकडून अनेकदा तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे संबधीत आठ पब आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली आहे.