पुण्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई
पुण्याच्या भवानी पेठेत मिलन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एकाच वेळी 40 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ही माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सोमनाथ बनकर यांनी संबंधित हॉटेल चालकाने कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे काही नागरिक मात्र कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांना हरताळ फासताना दिसून येत आहेत. पुण्यात अशाच एका घटनेत नियमांना हरताळ फासणाऱ्या हॉटेल चालकाला महापालिकेने 1 लाख रुपयांचा दंड ठोठालत कारवाई केली आहे.
पुण्याच्या भवानी पेठेत मिलन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एकाच वेळी 40 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ही माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सोमनाथ बनकर यांनी संबंधित हॉटेल चालकाने कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय यापुढे अशाप्रकारे कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले तर हॉटेल सील करण्यात येईल, असा इशाराही बनकर यांनी संबंधित हॉटेल चालकाला दिला आहे.