महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनचालकांना दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या 13 तृतीयपंथीयावर कारवाई

येरवड्यातील सादलबाबा चौकी, लोणी टोल नाका हडपसर, घड्याळ चौक बंडगार्डन, महालक्ष्मी मंदिर स्वारगेट आणि करिष्मा चौक अलंकार या ठिकाणी 13 तृतीयपंथीयावर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम (41) अन्वये कारवाई करण्यात आली.

crime branch pune
गुन्हे शाखा पुणे

By

Published : Jan 24, 2021, 3:19 PM IST

पुणे -सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तेरा तृतीयपंथीयावर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली.

पुणे शहरातील चौकाचौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना तृतीयपंथीयांकडून दमदाटी करून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकाचौकात भिक्षा मागणाऱ्या तृतीयपंथीयांची पडताळणी केली.

हेही वाचा -बारामतीत अनधिकृत बांधकामप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

नंतर येरवड्यातील सादलबाबा चौकी, लोणी टोल नाका हडपसर, घड्याळ चौक बंडगार्डन, महालक्ष्मी मंदिर स्वारगेट आणि करिष्मा चौक अलंकार या ठिकाणी 13 तृतीयपंथीयावर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम (41) अन्वये कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -सोरतापवाडीत एक गावठी पिस्तुलसह काडतूस जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details