पुणे - येरवडा कारागृहातील खिडकीचे गज उचकटून 16 जुलैच्या मध्यरात्री पाच कैद्यांनी पळ काढला होता. खून, दरोडा, मारामारी आणि मोक्याच्या या गुन्ह्यातील हे पाचही कैदी होते. यामधील देवगन अजिनाथ चव्हाण (वय 25) या कैद्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
येरवडा कारागृहातुन पळलेला 'तो' कैदी अखेर गजाआड - pune crime news
येरवडा कारागृहातील खिडकीचे गज उचकटून 16 जुलैच्या मध्यरात्री पाच कैद्यांनी पळ काढला होता. खून, दरोडा, मारामारी आणि मोक्याच्या या गुन्ह्यातील हे पाचही आरोपी होते. यामधील देवगन अजिनाथ चव्हाण (वय 25) या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
![येरवडा कारागृहातुन पळलेला 'तो' कैदी अखेर गजाआड Accused who escaped from Yerawada jail arrested](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8155809-199-8155809-1595588145866.jpg)
येरवडा कारागृहातुन पळलेला 'तो' आरोपी अखेर गजाआड
16 जुलैच्या मध्यरात्री येरवडा कारागृहाच्या खिडकीचे गज उचकटून खुनासह दरोडा मोक्का गुन्ह्यातील ३, खंडणी मोक्का गुन्ह्यातील १ व घरफोडी गुन्ह्यातील १ असे एकूण ५ कैदी पळून गेले होते. त्यापैकी २ कैदी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच पकडले होते. उर्वरित तिघांचा शोध सुरू होता.