पुणे:आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज येथे राहत होता. गुन्हा घडला त्या दिवशी तो वडिलांच्या घरी भोर येथे आला होता. शिवमच्या वडलांनी शिवमच्या आईच्या मृत्यूनंतर रेश्मा शिंदे ह्यांच्याशी विवाह केला होता. वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग त्याच्या मनात होता, वडील रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत त्याने पहाटे सावत्र आई रेश्मा शिंदे या झोपेत असताना गळा चिरून, नंतर दगडी वरवंटा डोक्यात घालून निर्घृन हत्या केली होती. खून झाला त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. रेश्मा यांची मुलगी क्षितिजा (18 ) यांनी याबाबत तक्रार दिली होती.
Accused arrested : आईची हत्या करून फरार झालेला आरोपी अखेर गजाआड
आईची धारधार शस्त्राने हत्या करून फरार झालेल्या ( absconded after killing mother ) आरोपीला, पुण्यातील भोर पोलिसांच्या (bhor police) पथकाने दिल्लीतून अटक केली (Accused arrested).शिवम अंकुश शिंदे असे 22 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याच्या सख्या आईचे निधन झाल्यावर वडलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून, त्याने सावत्र आईची हत्या केली त्यानंतर तो फरार होता.
आई रेश्मा शिंदे ह्यांचा खून केल्यानंतर शिवम हा कोल्हापूर, आंध्रप्रदेश, तिरुपती, तेलंगना, ओरिसा, मुंबई,मध्यप्रदेश, हरियाणा अश्या वेगवेगळ्या फिरत होता. या 23 दिवसांत तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत पोलिसांना गुंगारा देत राहिला. तीन दिवसांपासून तो दिल्लीतल्या एका मिठाईच्या दुकानात पार्सल पोहचवण्याचे काम करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर भोर पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्यात. ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक शेळके, विकास लगस, अजय साळुंखे, दत्तात्रय खेंगरे,चेतन पाटील,अमोल शेडगे,बाळासाहेब खडके यांनी केली आहे.
हेही वाचा :Mumbai crime: मुंबईतील खार परिसरात महिलेवर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल