पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ओल्या अंडरवेअर वरून ओळखत बेड्या ठोकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी संतोष विश्वास माने (वय 38) यांचा खून झाला होता. मात्र, खुनाचा गुन्हा उलगडत नव्हता. अखेर, हिंजवडी पोलिसांच्या कामगिरीला यश आले आणि आरोपीच्या अंडरवेअर वरून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या प्रकरणी कैलास अंकुश डोंगरे (वय 23) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीच्या अंडरवेअरवरून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा - Hinjewadi Police
हिंजवडी पोलिसांच्या कामगिरीला यश आले आणि आरोपीच्या अंडरवेअर वरून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या प्रकरणी कैलास अंकुश डोंगरे (वय 23) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास आणि संतोष या दोघांची कुटुंब हे शेजारी राहतात. दोन दिवसांपूर्वी कैलास ने संतोष चा खून केला होता. दरम्यान,घटनास्थळी हिंजवडी पोलिसांनी धाव घेत चौकशी सुरू केली. तेव्हा, मृत संतोष यांच्या पत्नी सरस्वती यांनी आमच्या शेजाऱ्याशी नेहमी भांडण होत असे सांगितले. एवढ्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी शेजारच्या घरात जाऊन चौकशी केली. तेव्हा घरात ओली साबण आणि घराबाहेर ओली अंडरवेअर आढळून आली. ती मुलाची असल्याचे वडिलांनी सांगितले. दरम्यान, कैलास हा गुन्हा काबुल करण्यास तयार नव्हता. अखेर वडिलांच्या समोर अंडरवेअर कोणाची आहे असे विचारताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.