महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lure Marriage : लग्नाचे आमीष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला अटक - Accused Arrested By Lonikand Police

ऑनलाइन वेबसाईटवरून ओळख करत लग्नाचे आमीष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक ( Accused Arrested By Lonikand Police ) केली आहे.  सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर हा वाढला असून या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणत फसवणूक देखील केल्या जात ( Lakhs Of Rupees Fraud Lure Marriage ) आहेत.

Lure Marriage
लग्नाचे आमीष

By

Published : Nov 12, 2022, 1:13 PM IST

पुणे :सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर हा वाढला असून या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणत फसवणूक देखील केल्या जात ( Lakhs Of Rupees Fraud Lure Marriage ) आहेत. एखाद्या ॲपवरून ओळख करायची आणि त्यातून त्याची फसवणूक करायची अश्या घटना सध्या शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ऑनलाइन वेबसाईटवरून ओळख करत लग्नाचे आमीष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक ( Accused Arrested By Lonikand Police ) केली आहे.

लाखो रुपये उकळले :राकेश कुमार हकींगसिंग चहर ( वय 36, सध्या रा. हडपसर, मूळ गाव - उत्तर गोवा ) असे आरोपीचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सात लाख रुपये तरुणीकडून उकळणाऱ्याला लोणीकंद पोलिसानी गजाआड केले. इन्स्टाग्रामवरील त्याच्या फोटो मागील फ्लॅटच्या गॅलरीच्या भागाच्या फोटोचा आधार घेत त्याला पकडण्यात लोणीकंद पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.


लोणीकंद पोलिसांच्या पथकाला यश :राकेश हा विवाहित असतानाही त्याने साईटवरून तरुणीची ओळख केली. मी तुझा होणारा नवरा आहे असे भासवून भावनिक संबंध वाढविले. यानंतर आईस्क्रीम व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून तिच्याकडून सात लाख रुपये घेतले. तिला संशय आल्याने तिने पैसे परत मागितले. त्याने तिला शिवीगाळ करून आपले दोन्ही मोबाइल बंद केले. मोबाइल बंद असल्याने त्याला शोधणे कठीण होते. मात्र पोलिसानी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरील फोटो मिळविला. त्या फोटोत फ्लॅटच्या गॅलरी चा काही भाग दिसत होता. त्यावरून पोलिसानी शोध घेत त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details