महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर प्रकरण : 6 दिवसांनंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Shirur molestation case

प्राणघातक हल्ला झालेली पीडित महिला 37 वर्षांची असून पतीसोबत न्हावरे गावात पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होती. 3 नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास घराच्या आजूबाजूलाच शौचालयास गेल्यानंतर बाजूच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेची छेड काढली.

accused arrested in shirur case
शिरुर प्रकरण

By

Published : Nov 9, 2020, 5:46 PM IST

पुणे -शिरूर येथील न्हावरे गावात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडण्यात आले होते. मंगळवारी हा प्रकार घडला होता. यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज (सोमवारी) सायंकाळी 7 वाजता शिक्रापूर याठिकाणी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पत्रकार परिषद घेणार आहेत.

काय आहे प्रकरण ?

प्राणघातक हल्ला झालेली पीडित महिला 37 वर्षांची असून पतीसोबत न्हावरे गावात पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होती. 3 नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास घराच्या आजूबाजूलाच शौचालयास गेल्यानंतर बाजूच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता.

महिलेवर हल्ला करत डोळे केले निकामी -

नराधमाने महिलेवर प्राणघातक हल्ला करत तिचे केस पकडून खाली पाडले. यानंतर त्याने धारदार हत्याराने एक डोळा बाहेर काढला, तर दुसरा जागीच निकामी केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचा पती व शेजारील नागरिक मदतीसाठी धावत आले. यानंतर हल्लेखोर फरार झाला. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details