महाराष्ट्र

maharashtra

डॉक्टर दाम्पत्याचे हातपाय बांधून दरोडा टाकणाऱ्यांना मध्यप्रदेशातून केली अटक

By

Published : Jul 31, 2021, 6:02 PM IST

लोणावळ्यात डॉक्टर दाम्पत्याच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या 8 दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. यातील सात आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण 66 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. जून महिन्यात हा प्रकार घडला होता.

ु

पुणे- लोणावळ्यात डॉक्टर दाम्पत्याच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या 8 दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. यातील सात आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या दरोडेखोरांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण 66 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. जून महिन्यात हा प्रकार घडला होता.

हेमंत रंगराज कुशवाह, नथु साधू विश्वासराव, सुनील शंकर शेजवळ, रविंद्र काशिराम पवार, श्याम सुंदर शिवनाथ शर्मा, मुकेश रमेश राठोड, सागर रमेश धोत्रे, प्रशांत उर्फ हेमंत रंगराज कुशवाह उर्फ पटेल, दिनेश जयराम अहिरे, शंकर गुरव, संजय भगवान शेंडगे, दौलत भावसिंग पाटील, विजय चंद्रप्रकाश पटेल, गोविंद थानसिंग कुशवाह आणि प्रदीप लल्लू धानुक, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 17 जूनच्या रात्री डॉ. हिरालाल खंडेलवाल (वय 73 वर्षे) हे पत्नीसह लोणावळ्यातील राहत्या घरात झोपले होते. घरात दोघेच पतिपत्नी असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीतून बंगल्यात प्रवेश केला आणि खंडेलवाल पती-पत्नीला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा 66 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. लोणावळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यातील प्रमुख आरोपी हे मध्यप्रदेशात असल्याचे समजल्यानंतर तीन आठवडे त्यांनी मध्य प्रदेशात तळ ठोकला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून पाच मुख्य आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 30 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणावळा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

हेही वाचा -खेळाच्या बाबतीत इतर देशाची बरोबरी करण्यासाठी भारताला 100 वर्षे लागतील - पैलवान काका पवार

ABOUT THE AUTHOR

...view details