पुणे - कुरकुंडी येथील वृद्ध महिलेची हत्या करून तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास चाकण पोलिसांनी अवघ्या ४ ते ५ तासातच जेरबंद केले आहे. अनिल सुदाम वाघमारे वय ५२ वर्षे (रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहीती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकअशोक राजपूत अवघ्या ४ ते ५ तासात आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मेला पाईट पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख यांना माहिती मिळाली, की कुरकुंडी येथे घरात एकटी राहणारी वयोवृद्ध महिला (वय ७१ वर्षे) तिच्या घरात जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असून तिचा खून झालेला आहे. माहिती मिळताच, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, डी. बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच श्वान पथकाला व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण केले तसेच त्वरित पोलिसांची पथके तयार करून संपूर्ण कुरकुंडी गाव पिंजून काढले व अवघ्या ४ ते ५ तासात आरोपी अनिल सुदाम वाघमारेला अटक केली.
महिलेन प्रतिकार केल्याने केला खून
आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिने प्रतिकार केला असता त्याने तिच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारून ठार केले. ती मृत झाल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला असल्याचे तपासात समोर आलेले आहे. या गुन्ह्याच्या तपासात पुणे येथील श्वान पथकातील श्वॉन ‘जॅक’ याची मोलाची मदत झालेली आहे. याप्रकरणी मृतक महिलेच्या सुनेच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.